नमस्कार मित्रांनो या Nissan कार कंपनीच्या उत्पादनाकडून SUV कारची मागणी वाढली असून ती लक्षात घेऊन आता दोन प्रकारच्या SUV कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या SUV कार मध्ये नवीन डिझाईन आणि काही जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे.
आताचे नवीन वर्ष म्हणजे 2024 हे ऑटो यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आता येत्या नवीन वर्षांमध्ये अनेक प्रकारचे कार उत्पादक कंपन्या ह्या दररोज नवनवीन SUV कार लाँच करत आहेत. आताच्या सर्व ग्राहकांचे लक्ष हे पूर्णपणे या SUV कारकडे लक्ष केंद्रीत झालेले दिसून येत आहे.
भारतीय बाजापेठेतील ऑटो क्षेत्रामधील विस्तार वाढवण्यासाठी निसान कार ही त्यांच्या आगामी काळात पाच तरी नवीन कार सादर करणार आहे. निसान या कारमध्ये 7 सीटर कारचा देखील समावेश असणार आहे. तसेच निसान त्यांची इलेक्ट्रिक कार सुद्धा देखील लवकरच लॉन्च करणार आहे.
Renault and Nissan कार उत्पादक कंपनीची लवकरच भागीदारी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपनीच्या भागीदारीतून लवकरच अनेक नवीन कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर झाल्याचे पाहायला मिळू शकते.
निसान खालील कार पुढील वर्षी करणार लाँच
Nissan X Trail
निसान कार उत्पादक कंपनीकडून त्यांची एक्स-ट्रेल एसयूव्ही कार पुढील वर्षी लाँच केली जाणार आहे. मात्र कंपनीकडून या कारच्या लाँचबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. या Nissan X Trail एसयूव्ही कार ही CMF-C प्लॅटफॉर्मवरती तयार केली जाणार आहे.
कारमध्ये 1.5L व्हीसी-टर्बो थ्री-पॉट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. निसान कार उत्पादक कंपनीची X-Trail एसयूव्ही कार सध्या जागतिक बाजारपेठेत विकली जात आहे. जागतिक बाजारपेठेत ही एसयूव्ही कार 2.4L चार-सिलेंडर NA पेट्रोल इंजिनसह विकली जात आहे. तसेच या कारमध्ये हायब्रिड इंजिन सुद्धा देखील उपलब्ध आहे. भारतात ही कार VW Tiguan आणि Skoda Kodiaq यांच्याशी स्पर्धा करू शकणार आहे.
Nissan Magnite Facelift
Read More= Honda NX500: शहरी भागातील लोकांना आता रायडींग करण्यासाठी खूप दिलासादायक ठरणार आहे.
निसान कार निर्मात्या कंपनीच्या लोकप्रिय मिनी मॅग्नाइट एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल 2024 मध्ये लाँच केले जाणार आहे. सध्या मॅग्नाइट एसयूव्ही कारमध्ये देण्यात येणारे 1.0L तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन त्याच्या NA आणि टर्बो इंजिन पर्यायासोबत सुरु राहू शकते. या कारच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र कारच्या फीचर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केले जाऊ शकतात.