Tata Upcoming MPV Car 2024: Ertiga, Innova खरेदी करताय? जरा थांबा… टाटा लॉन्च करणार जबरदस्त MPV कार

Date:- 24/12/2023

टाटा कंपनीने त्यांचे हॅचबॅक, एसयूव्ही आणि MPV कार सादर केली जात आहे. तर आता टाटा मोटर्स कंपनी आणखी एक MPV कार लाँच केली जाणार आहे.

टाटा कंपनी आता या नवीन (2024) वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दमदार कार लॉन्च करणार आहे. तसेच ही नवीन कार म्हणजे SUV आणि हॅचबॅक या कारचा समावेश असणार आहे.

टाटा मोटर्स ही कंपनी लवकरच लोकप्रिय SUV Nexon वर आधारित त्यांची नवीन MPV कार लॉन्च करू शकणार आहे. तसेच टाटा मोटर्स MPV कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता टाटा मोटर्स त्यांची स्टायलिश MPV कार लवकरच सादर करू शकत आहे.

टाटा मोटर्स MPV कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी आणि एर्टिगा कार यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. तसेच मारुतीच्या एर्टिगा कारला सुद्धा ग्राहकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Nexon SUV कारवरती टाटा मोटर्सची नवीन MPV कार आधारित असणार आहे. तर या कारच्या बूटलिपवर पूर्णपणे-लांबीचे कनेक्ट केलेले एलईडी डीआरएल, स्प्लिट एलईडी हेडलॅम्प्स, आकर्षक बंपर या कारमध्ये आपणास पाहायला मिळणार आहे.

टाटा मोटर्सची नवीन MPV कारमध्ये 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्राय-टोन डॅशबोर्ड, 2-स्पोक स्टीयरिंग व्हील Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारसारखेच दिले जाणार आहे.

Nexon एसयूव्ही कारमध्ये देण्यात येणारे 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन न देता आता या टाटा मोटर्सची नवीन MPV कारमध्ये 1.5 L टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार आहे. तसेच या कारला 1.5 लिटर एवढे डिझेल इंजिन देखील दिले जाऊ शकणा