Upcoming Mahindra Bolero

Date:- 24/12/2023

भारतातील सर्व ग्राहकांची आवडती महिंद्रा बोलेरो पुन्हा नवीन स्पोर्टी लूकसह मिळणार हे खास फीचर्स!

काही महिंद्रा कंपनीच्या गाड्या ह्या आता पूर्णपणे शक्तिशाली आणि मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. या नवीन प्रकारच्या MPV कारमधील महिंद्राच्या बोलेरो या MPV कारला ग्राहकांचा 23 वर्षांपासून चांगला प्रकारे प्रतिसाद मिळत दिसून येत आहे.

आतापर्यंत या गाड्या लाखो संख्येने विकल्या गेल्या आहेत. या Mahindra Bolero गाडीमध्ये काही नवीन अपडेट करण्यात आले आहेत.

आता महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडीचे नवीन मॉडेल लवकरच भारतीय बाजारपेठेत सादर केली जाणार आहे. ही महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी सर्वात प्रथम भारतामध्ये 2000 या साली लॉन्च करण्यात आली होती

आता नवीन जनरेशन बोलेरो कारमध्ये अनेक प्रकारची आधुनिक फीचर्स आणि नवीन स्पोर्टी लूक सुद्धा देण्यात आली आहे. या कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स आणि केबिनमध्ये लक्झरी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

या कंपनीकडून अद्याप आगामी बोलेरो कारबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र या कारचे डिझाईन आणि फीचर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळणार आहे.

आता सध्याच्या बोलेरो कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.80 लाख रुपये एवढी आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 10.81 लाख रुपये एवढी आहे.