Upcoming Mahindra Bolero 2024: भारतातील सर्व ग्राहकांची आवडती महिंद्रा बोलेरो पुन्हा नवीन स्पोर्टी लूकसह मिळणार हे खास फीचर्स!

Upcoming Mahindra Bolero:- नमस्कार मित्रांनो आपल्या भारतात महिंद्रा कंपनीची नवीन प्रकारची गाडी लॉन्च होणार आहे. काही महिंद्रा कंपनीच्या गाड्या ह्या आता पूर्णपणे शक्तिशाली आणि मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. या नवीन प्रकारच्या MPV कारमधील महिंद्राच्या बोलेरो या MPV कारला ग्राहकांचा 23 वर्षांपासून चांगला प्रकारे प्रतिसाद मिळत दिसून येत आहे.

Mahindra Bolero
Mahindra Bolero

जर आपली मोठी फॅमिली असेल, तर आपण फॅमिलीसाठी एक नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्रा कंपनीची नवीन प्रकारची बोलेरो गाडी घेऊ शकता. आतापर्यंत या गाड्या लाखो संख्येने विकल्या गेल्या आहेत. या Mahindra Bolero गाडीमध्ये काही नवीन अपडेट करण्यात आले आहेत.

आता महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडीचे नवीन मॉडेल लवकरच भारतीय बाजारपेठेत सादर केली जाणार आहे. ही महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी सर्वात प्रथम भारतामध्ये 2000 या साली लॉन्च करण्यात आली होती.

Read More:- Honda NX500: शहरी भागातील लोकांना आता रायडींग करण्यासाठी खूप दिलासादायक ठरणार आहे.

आता नवीन जनरेशन बोलेरो कारमध्ये अनेक प्रकारची आधुनिक फीचर्स आणि नवीन स्पोर्टी लूक सुद्धा देण्यात आली आहे. या कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स आणि केबिनमध्ये लक्झरी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

Mahindra Bolero
Mahindra Bolero

महिंद्रा कंपनीकडून त्यांची नवीन जनरेशन बोलेरो कार नवीन प्लॅटफॉर्म U171 वर विकसित केली जाईल. या कंपनीकडून अद्याप आगामी बोलेरो कारबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र या कारचे डिझाईन आणि फीचर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळणार आहे.

नवीन जनरेशन बोलेरो कारमध्ये काय असणार खास?

या नवीन बोलेरो जनरेशन कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. तर नवीन बोलेरो कारमध्ये मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ड्युअल क्लायमेट कंट्रोल एसी, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असे फीचर्स दिले जातील. तसेच या गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, ABS,रियर पार्किंग कॅमेरा, EBD, सेन्सर सारखे फीचर्स सुद्धा दिले जाण्याची शक्यता आहे.

Mahindra Bolero Engine

या बोलेरो कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात येत आहे. या गाडीचे हे इंजिन 20 Kmpl मायलेज देण्यास सक्षम ठरणार आहे. आता सध्याच्या बोलेरो कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.80 लाख रुपये एवढी आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 10.81 लाख रुपये एवढी आहे. तर महिंद्राकडून त्यांची नवीन जनरेशन बोलेरो कार 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Mahindra Bolero
Mahindra Bolero

Leave a Comment

Tata Upcoming MPV Car 2024 Mercedes Benz GLS Facelift 2024 Honda NX500 Upcoming Mahindra Bolero
Tata Upcoming MPV Car 2024 Mercedes Benz GLS Facelift 2024 Honda NX500 Upcoming Mahindra Bolero