Maruti Suzuki Grand Vitara:- नमस्कार मित्रांनो भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी कंपनीने त्यांचे ऑटो मार्केट वाढविण्यासाठी अनेक नवीन प्रकारच्या कार ह्या त्यांनी सादर केल्या आहेत. मारुती सुझुकी ह्या कार यांचा ग्राहकांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. 2024 या नवीन वर्षांमध्ये मारुती सुझुकी ही कंपनी अनेक कार लाँच करणार आहे.
या मारुती सुझुकीने गेल्या वर्षी त्यांची भारतीय ऑटो मार्केटमध्ये ग्रँड विटारा SUV कार लाँच केलेली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे. मारुती सुझुकीने ग्रँड विटारा SUV कार ही 5 सीटर सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. मात्र आता मारुती सुझुकीने त्यांच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारमध्ये 7 सीटर सेगमेंट उपलब्ध केले आहे.
Read More= Mahindra Thar मोठी ऑफर नववर्षाच्या शुभमुहूर्तावर फक्त रु. 50000 रुपयांमध्ये थार तुमच्या घरी आणा.
मारुती सुझुकीची आता नवीन ग्रँड विटारा एसयूव्ही कार ही टाटा सफारी आणि महिंद्रा XUV700 यांच्याशी स्पर्धा करू शकणार आहे. या मारुती सुझुकीकडून त्यांच्या आगामी ग्रँड विटारा 7 सीटर एसयूव्ही कारबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर ग्रँड विटारा 7 सीटर कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स सुद्धा देण्यात येणार आहेत. नवीन ग्रँड विटारा MPV कारची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपये एवढी असण्याची शक्यता आहे.
What will change in Maruti Suzuki Grand Vitara
ग्रँड विटारा एसयूव्ही कारचा सध्याचा व्हील्सबेस 5 सीटरसाठी देण्यात आलेला आहे. तसेच ग्रँड विटारा कारचा 7 सीटरचा व्हीलबेस हा मोठा असू शकणार. तसेच या कारला नवीन ग्रिल आणि एलईडी हेडलॅम्पसह नवीन फ्रंट डिझाइन मिळण्याची शक्यता आहे. तसेच नवीन ग्रँड विटारा कारमध्ये नवीन अलॉय व्हील आणि कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प ही मिळण्याची शक्यता आहे.
Maruti Suzuki Grand Vitara Engine
मारुती ग्रँड विटारा एसयूव्ही कारमध्ये 7 सीटर सेगमेंट उपलब्ध केला जाणार आहे. या कारमध्ये सौम्य-हायब्रीड सेटअपसह 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पर्याय दिला जाणार आहे. या गाडीचे इंजिन हे 115 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क पॉवर जनरेट करत असते. याचे इंजिन मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आलेले असणार.
7 Seater Maruti Suzuki Grand Vitara Features
या मारुती सुझुकीकडून त्यांच्या 7 सीटर ग्रँड विटारा SUV कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि मोठे सनरूफ, ऑटो-डिमिंग IRVM आणि दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स अशी प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.